बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राणेंनी रेकॉर्ड तोडला… इतिहासात दुसऱ्यांदा अन् 20 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अपशब्द वापरल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी ही घटना मानली जात आहे. केंद्रीय मंत्र्याला अशाप्रकारे अटक केली जाऊ शकते का?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात होता, मात्र नारायण राणेच नव्हे तर याआधी दोन केंद्रीय मंत्र्यांना देखील अशाच प्रकारे अटक झाली होती आणि आता तब्बल २० वर्षांनंतर राणेंच्या नावावर या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

नारायण राणे यांच्याआधी मुरसोली मारन, टीआर बालू या दोन केंद्रीय मंत्र्यांना अटक झाली होती. २००१ साली ही घटना घडली होती. त्यावेळी तमिळनाडूमध्ये करुणानिधी यांच्या द्रमुकचा पराभव करुन जयललिता सत्तेवर विराजमान झाल्या होत्या. चेन्नई उड्डाणपूल घोटाळ्याप्रकरणी त्यांनी करुणानिधी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. करुणानिधी यांना अटक करण्यासाठी पोहोचलेल्या पोलिसांना आडकाठी करण्याचं काम मारन आणि बालू यांनी केलं होतं, त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान, दोन केंद्रीय मंत्र्यांना अटक झाल्याने त्यावेळी चांगलीच खळबळ उडाली होती, मात्र सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप करत जयललिता सरकारने त्यांना अटक केली होती आणि ही अटक योग्य की अयोग्य हे न्यायालयाच ठरवेल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. न्यायालयाने दोन्ही मंत्र्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे कायदा सर्वांसाठी समान असून पोलीस मंत्र्यांना अटक करु शकतात, असं सिद्ध झालं होतं.

नारायण राणे यांना अटक करुन तब्बल २० वर्षांनी अशा प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे मुरसोली मारन आणि टीआर बालू यांच्यानंतर केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्याच्या यादीत आता नारायण राणे यांचा समावेश झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

मुंबई कोरोनामुक्त होतंय! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

70 वर्षात जे कमवलं होतं, ते सर्व मोदी सरकारने विकलं- राहुल गांधी

अफगाणिस्तानात अमेरिकेच्या गुप्त हालचाली; भेटीगाठीनं जगाच्या भुवया उंचावल्या

भाजपचा मोठा निर्णय! राणेंच्या अटकेनंतर ‘या’ नेत्याकडे जनआशीर्वाद यात्रेचं नेतृत्व

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More