बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“यांची काय औकात, तिकडं त्यांना कोण विचारतंय, उद्या सगळ्यांचा भांडाफोड करणार”

मुंबई | केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वाद चवाट्यावर आला आहे. 9 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन केंद्रीय वाहतूक हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थित होणार आहे. या कार्यक्रमाला नारायण राणेंसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.

चिपी उद्घाटनाची परवानगी मीच आणली होती. यांना कुणी विचारलही नव्हतं. रोज तारीख जाहीर करत होते. मी ज्योतिरादित्य शिंदेकडे गेलो होतो आणि तारिख निश्चित झाली. यांची काय औकात आहे. यांना तिकडे कोण विचारतेय ? कावकाव करून काही मिळत नाही. त्यासाठी बुद्धीचा वापर करावा लागतो, अशी टीका नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सिंधुदुर्गातल्या उद्योगपतींना फार त्रास आहे. गाडी घेऊन दिल्याशिवाय त्यांनी रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरु करू दिलं नाही. ही शिवसेनेची हफ्तेबाजी आहे. उद्या जाहीर सभेत मी सगळ्यांची नावं समोर आणणार आहे. विकासाच्या आड ही माणसं कशी येतात. त्यांचा मी भांडाफोड करणार आहे.

दरम्यान, चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावरून नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नारायण राणे उद्या उद्घाटनाच्या वेळी काय बोलणार आहेत. ते आता पहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘तुम्ही त्याच्या भविष्यासोबत….’; रविना टंडनही भडकली, बॉलिवूड तारकांचा आर्यनला पाठिंबा, !

“महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकला नाही आणि झुकणारही नाही”

सर्वोच्च न्यायालयाने केली लखीमपूर हिंसाचार प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात

एनसीबीनंतर आता डीआरआयची मोठी कारवाई; मुंबईतून जप्त केले 25 किलो ड्रग्ज

“पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते, मलाही ईडीची नोटीस पाठवली होती…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More