बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! मंत्री नवाब मलिकांना ईडीचा दणका

मुंबई | मंत्री नवाब मलिकांच्या पत्नीला आणि दोन मुलांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्यांनी उपस्थित राहण्यास टाळाटाळ केली असल्याचे ई़डीने सांगितलं आहे. त्यामुळं त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहेत.

मुलगा फराज मलिक यांना पाच वेळा समन्स बजावण्यात आले होते. परंतु पत्नी आणि मुलगा चौकशीला हजर राहिले नाही असं ईडीने आरोपपत्रात सांगितलं.

आरोपपत्रात ईडीने मलिकांचे डी गँगशी संबंध असल्याची माहिती दिली आहे. तसेच कुर्ल्यातील गोवावाला बिल्डिंग कंपाऊंड 1996 मध्ये हडपण्याचा कट रचला होता अशी माहिती ईडीने दिली आहे.

दरम्यान, 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा आरोपी दाऊद इब्राहिमचा भाचा अली शाह पारकर याच्या जबाबामुळे अनेक पुरावे हाती आले आहेत.

थोडक्यात बातम्या-  

ओबीसी आरक्षणप्रश्नी शरद पवारांची केंद्राकडे मोठी मागणी!

मंकी पॉक्सबाबत राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

“यापुढे जर कोणत्याही घटनेत शरद पवारांचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला तर…”

ज्ञानवापी प्रकरणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“मी पुन्हा येईन हे खरं करुन दाखवू, ते ही ब्रह्मदेवास चुकवून”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More