बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे धक्क्यावर धक्के, ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

औरंगाबाद | औरंगाबाद जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि काॅंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नितीन पाटील यांनी हातात शिवबंधन बांधलं आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार सध्या जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे निर्णय घेताना पहायला मिळत आहेत. त्यांच्या या निर्णयानं भाजपला मोठा धक्का बसला आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासुन काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या औरंगाबाद जिल्हा बँकेला आता अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेकडे खेचुन आणल्याचं पाहायला मिळत आहे. नितीन पाटील या नवनिर्वाचित बँकेच्या अध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेची औरंगाबादमध्ये ताकद वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

जिल्हा सहकारी बँक ताब्यात आल्याने शिवसेनेची औरंगाबादमधील बळ मोठ्या प्रमाणात वाढलं असल्याचं बोललं जात आहे. औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या निकालात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले.

माजी विधानसभा अध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक असलेले हरिभाऊ बागडे यांनाही या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीचं मतदान 21 मार्चला पार पडलं असून त्यावेळी मतदान केंद्राबाहेर अब्दुल सत्तार आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आला होता.

थोडक्यात बातम्या

उत्तर प्रदेश पोलिसांची अब्रू धुळीला, पोलिसासमोर चोरांनी गाडी नेली चोरुन!

नणंदेच्या नवऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली, त्यानंतर तीनं जे पाऊल उचललं ते अत्यंत धक्कादायक!

पुण्यातील कोरोनाबाधितांची आजचीही आकडेवारी धक्कादायक

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली कोरोनाची लस; नागरिकांना केलं ‘हे’ आवाहन

पोलिसाची शेतकऱ्याला शेतात जाऊन बेदम मारहाण, पाहा व्हायरल व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More