बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मंत्र्यांच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार”

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून (ST Employee Strike) राज्यात सध्या वाद पेटलेला आहे. राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर केली असली तरी आंदोलक कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. पण या आंदोलनावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. त्यातच राज्यमंत्री बच्चू कडू (Minister Bacchu Kadu) यांनी एसटी संपावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

यावेळी ते म्हणाले,’मंत्र्याच्या आणि कलेक्टरच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार चुकीचचं आहे. जो एसटी कर्मचारी हजारो लोकांना घेऊन प्रवास करतो. त्याला फक्त 12 हजार रुपये पगार मिळत असेल तर ते चुकीचं आहे,’ असा घणाघात त्यांनी केला आहे. पुढे त्यांनी आम्ही त्यांच्या बाजूने आहोत, असं म्हणत एसटी कर्मचाऱ्यांना पाठींबा दिला आहे.

मात्र, यावेळी बच्चू कडू यांनी यावेळी आंदोलन करण्याची ही वेळ नाही, असंही म्हटलं आहे. शिवाय पुढे त्यांनी आंदोलन मागे घेऊन येत्या काळात आम्ही त्यांच्यासाठी आंदोलन करु, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. बच्चू कडू सांगली येथे आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी गेले होते. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा तिढा अजून सुटताना दिसत नाही. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊन कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. मात्र, तरीही कर्मचारी संपावर अडून बसलेले आहेत. त्यामुळे सरकारने कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईचा इशारा दिला आहे. तरीही कर्मचाऱ्यांनी संप सुुरुच ठेवला आहे.

थोडक्यात बातम्या-

’25 वर्षाचा संसार मोडला’, असं म्हणणाऱ्या महाजनांना जयंत पाटलांनी दिलं हे सणसणीत उत्तर

पराग अग्रवालच्या नियुक्तीनंतर एलॉन मस्कने केलं भारतीय प्रतिभेचं कौतुक, म्हणाले…

‘आ देखे जरा…’; प्रविण दरेकरांच्या ‘त्या’ ट्विटवर मलिकांचं खास शैलित प्रत्युत्तर

पहाटेच्या ‘त्या’ शपथविधीचा फडणवीसांना पश्चात्ताप, म्हणाले मी पुस्तक लिहून…

‘…आणि दुसरीकडे अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षदा’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More