बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ, राज्यपाल कोश्यारींनी दिले ‘हे’ आदेश

अकोला | गेल्या काही दिवसांपासून शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाकडे पत्र सादर करताना प्रतिज्ञापत्रात फ्लॅटची माहिती लपवल्यामुळे चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा केली होती. त्यातच आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.

वंचित बहुजन आघाडीकडून बच्चू कडू यांच्याविरोधात राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली होती. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अकोला पोलिस अधीक्षकांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेत काही माहिती दिली होती.

बच्चू कडू यांनी बनावट दस्ताऐवज तयार करून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर शासकीय निधी वळवला, असा आरोप वंचित बहूजन आघाडीकडून करण्यात आला होता. या प्रकरणातील कागदपत्रे तपासल्यानंतर राज्यपालांकडून बच्चू कडू यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्हा नियोजन समितीने ठरवून दिलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत फेरफार केल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर करण्यात आला होता. तत्कालिन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. शासन मान्य क्रमांक नसलेल्या रस्त्यांच्या कामांची यादी जिल्हा परिषदेला पाठवली होती. यासंदर्भातील पुरावे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिले होते.

थोडक्यात बातम्या-

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

“शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा होतो, मग राष्ट्रवादीच्या का नाही?”

“मला धमकी आली तर…”, खासदार संभाजीराजेंचा थेट इशारा

शिवसेना-भाजप युतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

रशिया-युक्रेन युद्धात मोठी उलथापालथ, रशियन मीडियाच्या दाव्याने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More