बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेे हे आमचे नेते, माझं त्यांच्यावर खूप प्रेम- दत्तात्रय भरणे

सोलापूर | आज देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन आहे. देशभरासह राज्यात आज विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे राज्यमंत्री आणि सोलापुरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सोलापुरात ध्वजारोहण पार पडलं. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आज सोलापुर मध्ये पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोलापुर महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं.

या कार्यक्रमात दत्तात्रय भरणे बोलताना म्हणाले की, मी खूप समाधानी आहे आणि आमचे नेते अजितदादा आहेत. आपल्याला इथं चांगलं उद्यान करायचं आहे. तुम्ही मला प्रस्ताव द्या. मला नगरविकास आयुक्तांनी परवानगी दिली आहे. दत्तात्रय भरणे बोलत असताना महापौर म्हणाल्या की आपण मुख्यमंत्र्याकडून निधी आणू. पुढे भरणे म्हणाले की मुख्यमंत्र्याचं जाऊ द्या, मरू द्या आपण आपलं करु. मुख्यमंत्र्यांकडून मोठा निधी आणायचा असतो असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं होतं.

दत्तात्रय भरणे यांच्या या वक्तव्यामुळे वाद पेटला आहे. आपली चुक लक्षात येताच दत्तात्रय भरणेंनी व्हिडीओद्वारे माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेे हे आमचे नेते आहेत. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. जर माझ्यामुळं कोणाचं मन दुखावलं असेल तर माफी मागतो असं दत्तात्रय भरणे म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी दत्तात्रय भरणेंना जर हिंमत पाहायची असेल तर सोलापुरची सीमा ओलांडू देणार नाही असा इशारा सावंत यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेे यांच्यामुळेच तुम्ही सत्तेत आहात हे विसरु नका. आम्ही शिवसैनिक आहोत तुम्ही भाषा चांगली वापरा असा इशारा तानाजी सावंत यांनी दत्तात्रय भरणेंना दिला आहे.

थोडक्यात बातम्या –

धोनीने 7 वाजता 29 मिनिटांनी का घेतली होती निवृत्ती?, समोर आलं ‘हे’ खास कारण!

पत्नीला किस करायला गेला अन् पँटच आली खाली, नवरदेवाच्या उडालेल्या फजितीचा व्हिडीओ व्हायरल

लग्नाच्या आठच दिवसानंतर नववधूने सासरच्यांना लुटलं अन्…

तिसरी लाट भंयकर काळजी घ्या, सरकार तुमच्यासोबत- नितीन राऊत

लग्न पार पडताच नवऱ्याचा हात लावून घेण्यास नवरीचा नकार, पाहा व्हायरल व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More