बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘संजय राऊतांच्या अंगात आलं अन् राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं”

सोलापूर | राज्यात महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्ष सातत्याने टीका करताना दिसत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. अशातच राज्याचे सहकार आणि कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ते सोलापूर दौऱ्यावर आहेत.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अंगात आलं अन् राज्यात महाविकास आघाडीचे सरकार झालं. त्यांच्या अंगात आलं ते बरंच झालं, असं विश्वजीत कदम म्हणाले. शहरातील जिल्हा काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक काॅंग्रेस भवनात विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली

भाजपने खोटी आणि निकष लावून फसवी कर्जमाफी केली. परंतु महाविकास आघाडीमध्ये माझ्याकडे सहकार आणि कृषी खाते असल्याने निकषात बदल करून कर्जमाफी दिली. मोदी  सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत आला. भाजपवाले फसवे आहेत. म्हणूनच तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली, असं म्हणत विश्वजीत कदम यांनी भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना काॅंग्रेसने इंग्रजांना हाकलले, तर भाजप काय चीज आहे, त्यांनाही केंद्रातून पायउतार करू, आज रस्त्यावरील लढाईसोबत सोशल मीडियावरही लढाई लढायची असल्याचं कदम म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘शरद पवारांंना ‘तो’ अधिकार नाही कारण…’ ; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर निशाणा

‘…तर मी तुमचा ‘चड्ढा’ उतरवेल’; नवज्योत सिद्धूंवर केलेल्या ‘त्या’ टीकेमुळे राखीचा चढला पारा!

माही मार रहा है! सराव सामन्यातच धोनीने मारले अर्धाडझनभर षटकार, पाहा व्हिडीओ

देवेंद्र फडणवीस अन् जयंत पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास!

अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचा ‘कॅप्टन’ कोण?; ही 2 नाव आघाडीवर!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More