शरद पवारांच्या आजारपणावरून टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना शंभुराज देसाईंनी झापलं, म्हणाले…
मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात कथित भेटींच्या चर्चांना दिल्लीसह महाराष्ट्रात उधाण आलं होतं. त्यानंतर दिल्लीत शरद पवारांच्या हालचलीवर लक्ष ठेवण्यात येत होतं. शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास वाढल्यानं मंगळवारी रात्री त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. शरद पवारांना मंगळवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात भरती करण्यात आल्यानंतर दिल्लीतल्या काही भाजप नेत्यांनी, हे शरद पवारांचं राजकारण आहे, अशी टीका केली होती. त्यावर आता गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी या भाजप नेत्यांना चांगलंच फटकारलं आहे.
भाजप नेते नविन कुमार जिंदल यांनी एक ट्विट केलं होतं. सचिन वाझे यांनी तपास यंत्रणेला काय सांगितलं की, शरद पवार यांच्या पोटात इतक्या जोरात दुखायला लागलं. त्यांना रूग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. मला तर वाटतं, ‘दाल मे कुछ काला नही है , पुरी दाल ही काली है’, असं नविन कुमार जिंदल म्हणाले होते.
शरद पवारांच्या आजारपणावरून ट्विट केल्यानं शंभुराज देसाई यांनी जिंदल यांना फटकारलं. शरद पवारांच्या आजारपणात भाजप नेत्यांनी राजकारण करावं हे काही बरोबर नाही. मला अशा लोकांची कीव करावी वाटते, असं उत्तर शंभुराज देसाई यांनी दिलं. भाजपच्या जिंदल यांनी शरद पवारांच्या आजाराचा संबंध सचिन वाझे प्रकरणाशी जोडल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिंदल यांना टॅग करत त्यांच्यावर जोरदार टीका केली.
दरम्यान, लाॅकडाऊन करण्याची सरकारची इच्छा नाही परंतू लोकांनी नियम पाळणं गरजेचं आहे. सरकार यासाठी कडक पाऊलं उचलत आहे. लोकप्रतिनिधी नियम मोडणार असेल तर ते योग्य नाही. खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी भूमिका देखील शंभुराज देसाई यांनी घेतली आहे.
थोडक्यात बातम्या-
“…तर मुंबईत दिवसाला 10 हजार कोरोना रूग्ण आढळतील”
देवेंद्र फडणवीस- जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगलं ट्विटर वाॅर; कारण ठरले अनिल देशमुख
‘वाघांच्या राज्यात लांडग्यांची चलती कशी?’; प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
कोरोना लसीबाबत चिंता वाढवणारी बातमी; जगभरातील तज्ज्ञांच्या सर्व्हेने एकच खळबळ
पुण्यात एकाच दिवशी 1 लाख नागरिकांना कोरोना लस, सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.