बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् मीच पास झालो अशी मला फिलिंग आली, राज्यमंत्री तनपुरेंचं विद्यार्थ्यांना खास पत्र

पुणे |   पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचं काय होणार अशी चिंता पालक आणि विद्यार्थ्यांना लागून राहिली होती. मात्र उद्धव ठाकरे सरकारने सकारात्मक निर्णय घेत सद्यपरिस्थितीत परीक्षा घेणं शक्य नसल्याचं सांगत आतापर्यंतच्या झालेल्या सेमिस्टरच्या गुणांची सरासरी काढून पास करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. याच दरम्यानच्या काळात विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील घालमेल राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या शब्दात फेसबुक पोस्टद्वारे मांडली आहे.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात-

“काल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अंतिम परीक्षांबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आणि मीच परीक्षा पास झालो की काय अशी फिलिंग मला आली. खरंच लॉकडाऊन सुरू झाल्यापासूनचा काळ मला माझ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसारखा वाटला. तेच टेन्शन… तीच गडबड… तेच प्रेशर मला जाणवलं. सतत विविध माध्यमातून मी तुमच्याशी बोलत राहिलो”

“कोणी शहरात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी गावी गेले होते, कोणी कोरोनाच्या भीतीने परीक्षा केंद्रात जायला घाबरत होते, अभ्यासू विद्यार्थी परीक्षेसाठी तयार होते, कोणी परीक्षेबाबत पसरलेल्या अफवांना बळी पडत होते… भीती सारखी असली तरी प्रत्येकाच्या मनातील संभ्रम वेगळा होता. सुवर्णमध्य गाठणं दिवसेंदिवस कठीण होत होतं. मानसिकरित्या, आरोग्याच्यादृष्टीने तुम्हाला कसलीच अडचण येऊ नये ही हुरहूर कायम मनात होती. त्यात तुमच्या भविष्याची चिंता अधिक तीव्रतेने जाणवत होती. त्या सर्व गोष्टींचा सारासार विचार करत आम्ही निर्णय घेतला”

“आता तुम्हाला सरासरी मार्क्स मिळतील. मान्य आहे की याने माझे काही मित्र दुखावलेही जातील. मात्र आपण त्यावरही मार्ग काढू. पण खरं सांगू का मित्रांनो, या कागदावरच्या परीक्षा होत राहतील, मात्र खरी परीक्षा काय असते ते आपल्याला जीवनात येणारे चढउतार शिकवत असतात. आता त्याच एका नैसर्गिक आपत्तीच्या परीक्षेतून आपण जात आहोत. ही परीक्षा खूप अवघड आहे पण कठीण नाही. पुढे येणाऱ्या सर्व संकटांना खंबीरपणे सामोरे जाण्याचा धडा आपल्याला यातून मिळणार आहे. चला तर मग धैर्याने, एकीने आणि सकारात्मकतेने आपण पुढे जाऊयात”

ट्रेंडिंग बातम्या-

“मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 342 कोटी रुपये जमा, केवळ 7 टक्के रक्कम आरोग्य सुविधांसाठी खर्च”

कोरोना योद्ध्यांवर हल्ले करणाऱ्यांना नरेंद्र मोदींनी खडसावलं, म्हणाले…

महत्वाच्या बातम्या-

गरिबांना वाऱ्यावरती सोडणारे हे श्रीमंतांचे सरकार आहे – प्रकाश आंबेडकर

‘जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले त्यांनी…’; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

‘सरकारने काम केलं नसतं तर…’; गुजरात उच्च न्यायालयाकडून आता सरकारचं कौतुक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More