बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राहुल गांधी की यात्रा में दम नहीं और इस यात्रा से हमें कोई गम नहीं”

नवी दिल्ली | काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेला राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्वात सुरूवात झाली. राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेची भाजपकडून (BJP) खिल्ली उडवण्यात आली. त्यानंतर आता आरपीआयचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawle) यांनीही या यात्रेवरून टोलाा लगावला आहे.

इंदौर येथील एका कार्यक्रमात बोलताना रामदास आठवलेंनी भारत जोडो यात्रेचा भारत तोडो उल्लेख करत निशाणा साधला. तर या बेदम प्रवासाने राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर (PM Narendra Modi) राजकीय यश मिळू शकत नाही, असा दावाही आठवलेंनी केला.

पुढे बोलताना आठवलेंनी त्यांच्या खास शैलीत राहुल गांधी व भारत जोडो यात्रेवर टीका केली आहे. राहुल गांधी की यात्रा में दम नहीं और इस यात्रा से हमें कोई गम नहीं, असा टोला आठवलेंनी लगावला आहे.

दरम्यान, खूप आधी डॉ. आंबेडकरांनी बनवलेल्या राज्यघटनेमुळे भारत एकसंध झाला होता. आणि आता पंतप्रधान मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या भावनेने देशाला जोडण्याचं काम आम्ही पुढे नेत आहोत, असंही रामदास आठवले म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

काळजी घ्या! पुढचे 3 दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

“गद्दारी करणारे परत निवडून येणार नाहीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More