कोल्हापूर महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील हे पुण्याचे, सुट्टीसाठी कोल्हापुरात येतात- सतेज पाटील

कोल्हापूर | चंद्रकांत पाटील हे पुण्याचे, सुट्टीसाठी ते कोल्हापुरात येतात. हिंमत असेल तर त्यांनी केंद्राविरोधात आंदोलन करावं. ते केंद्र सरकारविरोधात आंदोलन का करत नाहीत, असा सवाल गृहराज्य मंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केला आहे.

सतेज पाटील यांनी एकाचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर निशाणा साधला. भाजपचं कोल्हापुरातील दुधासाठीचं आंदोलन म्हणजे अस्तित्व दाखवण्यासाठीचा प्रयत्न आहे, असा टोला सतेज पाटील यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांना लगावला आहे.

काही तरी अस्तित्व दाखवण्यासाठी हे आंदोलन आहे. लोकांच्या हितासाठी हे आंदोलन नाही. तुम्ही काय काम केलं हे जनतेला माहित आहे. दूध उत्पादकांची कणव भाजपला नाही. केंद्राची जबाबदारी महत्वाची आहे, असं सतेज पाटील म्हणाले.

आंदोलनाला प्रतिसाद नाही. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न झाला. स्वाभिमानीसोबत बोलणं झालं. लवकरच सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे. राजू शेट्टींवर आंदोलनाची वेळ येणार नाही, असा विश्वास यावेळी सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय.

महत्वाच्या बातम्या-

…अन्यथा शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर येऊन धडकेन; राधाकृष्ण विखेंचा सरकारला इशारा

मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी FIR का नाही नोंदवला?- सुब्रमण्यम स्वामी

‘पुराव्यांशी छेडछाड होऊ नये, या प्रकरणात लक्ष द्या’; सुशांतच्या बहिणीचं पंतप्रधान मोदींना आवाहन

‘मुंबई पोलिस सक्षम…’ सुशांत सिंगच्या आत्महत्येचं राजकारण करणाऱ्यांना रोहित पवारांनी खडसावलं!

राजस्थानमधील तमाशा पंतप्रधान मोदींनी बंद करावा- अशोक गेहलोत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या