मुंबई | राज्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. यातच महाराष्ट्राचे अजून एक मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडेल आहेत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झालेली आहे.
उदय सामंत यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, गेले दहा दिवस मी स्वतः विलगिकरणात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. त्याचा रिपोर्ट+ve आला आहे.
गेले दहा दिवस स्वतः विलगिकरनात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली.रिपोर्ट+ve आला आहे.मी गेले10दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे.. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार.
— Uday Samant (@samant_uday) September 29, 2020
मी गेले10 दिवसांत कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार, असंही सामंत म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! कोरोनामुळे जगातील इतक्या लाख रुग्णांचा मृत्यू
सुशांत मृत्यू प्रकरणी एम्सच्या डॉक्टरांनी सीबीआयकडे सोपवला अंतिम अहवाल
“महाराष्ट्र जातीपातीच्या लढाईत फाटू नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे”
आमदार निवासात मध्यरात्री फोन, बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Comments are closed.