महाराष्ट्र मुंबई

मी ओबीसी म्हणून मला त्रास दिला जातोय- विजय वडेट्टीवार

मुंबई | मराठा क्रांती मोर्चाने विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलीये. मी ओबीसी म्हणून मला त्रास दिला जातोय, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

मी ओबीसी समाजातून आलेलो आहे म्हणून सतत मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे असं वाटत असल्याने, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सारथीची जबाबदारी मराठा मंत्र्याकडे देण्याची विनंती करणार आहे, अशी विजय वडेट्टीवार यांनी दिली.

सारथी संस्था बंद पडणार नाही हे मी आजही छातीठोकपणे सांगतो. पण यामागे राजकीय मंडळी या मंडळींना चिथावणी देत आहेत, त्यांची नावं योग्यवेळी जाहीर करेन, असंही यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले.

मी प्रामाणिकपणे काम करतोय. पण तरीही तुमचे आरोप झाल्यानंतर मला त्यामध्ये काम करण्यात रस नाही. आमच्या सरकारला केवळ 6 महिने झाले आहेत. मात्र चार महिन्यांपेक्षा जास्त काळ कोरोनामध्ये गेले. सर्वांना माहिती आहे की आर्थिक परिस्थिती बिकट आहे. निधीचा तुटवडा आहे. पण हा निधी मागे-पुढे होईल, मात्र सारथी बंद पाडणार नाही, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

शिवसेना-राष्ट्रवादीत फोडाफोडीचं राजकारण; पारनेरमध्ये शिवसेनेला, कल्याणमध्ये राष्ट्रवादीला दणका!

स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ‘महाजॉब्स’ वेबपोर्टलचे लोकार्पण

महत्वाच्या बातम्या-

अजित पवारांच्या सूचनेनंतर पुण्याचे विभागीय आयुक्त ‘इन अ‌ॅक्शन मोड!’

हे सरकार नाही तर सर्कस आहे, नितेश राणेंचा महाविकास आघाडीवर टीकेचा बाण

मास्क घातला नाही तर 10 हजार रूपये दंड, ‘या’ राज्य सरकारने घेतला निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या