बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराचा प्रयत्न हाणून पाडू- उदय सामंत

बीड | पत्रकारितेसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. रानडे इन्स्टिट्यूट ही पत्रकारितेचं शिक्षण देणारी देशातील महत्वाची आणि नावाजलेली संस्था आहे. त्यामुळे रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराबाबत अनेकांनी विरोध दर्शवल्यानंतर आता राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे, ती बीडमध्ये बोलत होते.

रानडे इन्स्टिट्यूट दुसरीकडे स्थलांतरीत करून तेथील जागा कुण्या बिल्डरला देण्याचा प्रयत्न होत असेल तर तो प्रयत्न मी एक मंत्री म्हणून हाणून पाडेल, असं उदय सामंत यांनी बीडमधील पत्रकार परिषदत बोलताना सांगितलं आहे.

फर्गसन कॉलेज रस्त्यावरील रानडे इन्स्टिट्यूटच्या जागेची आजच्या बाजारभावानूसार किंमत 400 कोटी इतकी असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतर करून ती जागा एका बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा खळबळजनक आरोप विद्यार्थी कृती समितीने केला आहे. त्यामुळे या वादाला आता वेगळंच वळण मिळालं आहे.

दरम्यान, उदय सामंत यांनी बीडमधील पत्रकार परीषेदत विविध विषयांचा आढावा घेतला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनाही योग्य त्या सूचना सामंत यांनी दिल्या. रानडे इन्स्टिट्यूट स्थलांराबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर मी उद्या (शनिवार) रानडे इन्स्टिट्यूटला भेट देणार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘त्या’ न्यूड फोटोमुळे राधिका आपटे सोशल मीडियावर ट्रोल!

राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ; आता आणखी एक टीम करणार चौकशी

राज्यातला डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला; मृत्यूच्या संख्येत होेतेय वाढ

पुणे श्रमिक पत्रकार संघाचा रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराला विरोध

‘…हे कदाचित राज ठाकरे यांना माहित नसावं’; राज ठाकरेंच्या टीकेला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More