बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लोकांना लसीकरणात काय अडचणी येतात हे पाहण्यासाठी मंत्र्यांनी रांगेत उभं रहावं- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | सर्वांनी लसीकरणाचं काम सुरू करावं. लस घेणाऱ्या लोकांसोबत रांगेत उभा राहा आणि लोकांना काय त्रास होत आहे ते पाहा. सरकारच्या गरीब कल्याणकारी योजनांचा तळागाळातल्या जनतेला कसा फायदा व्हावा यावर काम करा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रीपरिषदेची बैठक झाली. या बैठकीत मोदींनी बैठकीत कोरोनाबाबत आरोग्य मंत्रालय, नागरी उड्डयन मंत्रालय, रस्ते व परिवहन मंत्रालय आणि दूरसंचार मंत्रालयाचा आढावा घेतला.

तुम्ही आपल्या लोकसभा मतदार संघात गेलात तर मास्क वापरा आणि लोकांनाही मास्क वापरण्यासाठी जागरूक करा. असं समजू नका, की कोरोना आता गेला आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे, असंही नरेंद्र मोदी यावेळी म्हणालेत.

दरम्यान, ही बैठक ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आली. यात कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेच्या भीतीबरोबरच इतरही बर्‍याच मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच मोदींनी 75 वा स्वातंत्र्यदिन कसा संस्मरणीय बनवता येईल याविषयी चांगल्या सूचनाही मंत्र्यांना मागितल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा काच शिल्लक ठेवणार नाही”

गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर झालेला हल्ल्ला हा भाजपने घडवून आणलेला स्टंट, राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

राज्यपालांच्या पत्रावर नवाब मलिकांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

…तोपर्यंत महाविद्यालये सुरु करता येणार नाही- उदय सामंत

“महाराष्ट्र दिल्लीशी झगडा करतो तेव्हा दिल्लीस शरण यावं लागतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More