Top News

महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचं भीषण वास्तव; पोलीस भरतीसाठी पदं 8 हजार अन् अर्ज 12 लाख

Loading...

मुंबई | ठाकरे सरकारने काढलेल्या पोलीस भरतीच्या अर्जांवरून महाराष्ट्रातील बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर आलं आहे. महाराष्ट्र पोलीस दलात शिपाई पदाकरिता 8 हजार पोलिसांच्या भरतीसाठी राज्यातल्या तब्बल 12 लाख तरूणांनी अर्ज केले आहेत.

ठाकरे सरकारच्या पोलीस भरतीच्या निर्णयाने राज्यातली बेरोजगारी अधोरेकित करणारी आकडेवारी उजेडात आली आहे. 8 हजार पदांसाठी 12 लाख अर्ज आलेत. याचाच अर्थ एका जागेसाठी तब्बल 150 उमेदवार एकमेकांशी स्पर्धा करतील.

Loading...

राज्यातली वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय. सत्तास्थापन केल्यानंतर महाविकास आघाडीने सर्वांत मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. मात्र एकीकडे पोलिसात भरती होण्यासाठी राज्यातले तरूण मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत, तर दुसरीकडे यानिमित्ताने राज्यातील बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर येतंय.

पोलीस भरती प्रक्रिया करताना महापोर्टल ऐवजी ऑफलाईन परीक्षा घेण्याचा विचार शासन करत आहे. 12 लाख तरूणांची महापोर्टलद्वारे परीक्षा घेणं हे जवळजवळ अशक्य आहे. यामुळेच ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचा सरकारचा मानस आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

“…म्हणून मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढेंची नागपुरात बदली केली असावी”

“आमच्याकडे सर्टीफिकेट मागण्यापूर्वी मोदींनी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट आणावं”

महत्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या