बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान! लहान मुलांमध्ये ‘ही’ लक्षणं आढळल्यास त्वरित घ्या डॉक्टरांचा सल्ला

नवी दिल्ली | गेल्या वर्षभरापासून कोरोनाने नको नकोसं केलं आहे. या रोगामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. यामध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही तज्ज्ञांच्या आणि डॉक्टरांच्यामते यानंतर तिसरी लाटही येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पुढच्या लाटेमध्ये लहान मुलांना जास्त धोका असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने लहान मुलांबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानूसार ज्या मुलांना 3 ते 4 दिवसांपर्यंत जास्त ताप येत असेल, जी मुलं जेवण करायला टाळाटाळ करत असतील, ज्या मुलांना कमी जेवण जात असेल. या प्रकारची लक्षणं ज्या मुलांमध्ये दिसून येतील अशा मुलांच्या पालकांनी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं सांगण्यात आलं आहे.

तसेच ज्या मुलांमधील ऑक्सिजनची पातळी 95 च्या खाली गेली आहे. अशा मुलांना वृद्ध व्यक्तींपासून दूर ठेवलं पाहिजे. कारण कोरोना लक्षणे असलेली मुलं वृद्ध लोकांसाठी धोका निर्माण करू शकतात. जारी केलेल्या यादीमध्ये लठ्ठपणा, मधूमेह, हृदय, फुफ्फुसे, इतर गंभीर आजार असणाऱ्यां मुलांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका जास्त असल्याचं सांगितलं आहे.

त्याचबरोबर मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुलांना दुधात हळद घालून देणे, चवनप्राश खायला द्यायला सांगितलं आहे.मुलांमध्ये पोषण वाढविण्यासाठी, त्यांना हिरव्या भाज्या आणि फळे खायला द्यायला सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“…म्हणून मुस्लिम समाजातील लोक कोरोना लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत”

एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मराठी अभिनेत्याला अटक

“राममंदिर ही भाजपची खासगी मालमत्ता नाही, आम्हीही राममंदिरासाठी विटा दिल्या आहेत”

तब्बल वर्षभरानंतर कोरोनाचं हाॅटस्पाॅट बनलेल्या ‘या’ जिल्ह्यात सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार का?, विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More