कंडोम वापरणाऱ्या अविवाहित महिलांचं प्रमाण सहापटीनं वाढलं

Condom.

नवी दिल्ली | कंडोम वापरणाऱ्या अविवाहित महिलांच्या संख्येत गेल्या दहा वर्षात सहापटीनं वाढ झालीय. आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या ‘नॅशनल फॅमिली सर्व्हे’तून ही बाब समोर आलीय. 

15 ते 49 वयोगटातील महिलांमध्ये कंडोम वापरण्याचं प्रमाण 2 टक्क्यांवरुन 12 टक्क्यांवर गेलंय. तर 20 ते 24 या वयोगटातील मुलींचं कंडोम वापरण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. 

समाधानाची बाब म्हणजे भारतील 99 टक्के विवाहित जोडप्यांना किमान एका गर्भनिरोधक पर्यायाची माहिती आहे. 25 ते 49 वयोगटातील महिला कुटुंबनियोजनासाठी नसबंदीला प्राधान्य देत असल्याचं समोर आलंय.