बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अल्पवयीन मुलीवर अॅम्ब्युलन्समध्ये बलात्कार

उल्हासनगर| अल्पवयीन मुलीवर अॅम्ब्युलन्समध्ये बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला. राहूल जाधव असं बलात्कार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.

आरोपी हा रिक्षाचालक असून तो पिडीत मुलीच्या परिसरात राहतो. पिडीतेचे आईवडिल रिक्षातून ये जा करत असत. याच दरम्यान ओळखीचा फायदा घेत पिडीत मुलगी आजारी असताना तीला रुग्णालयात जाण्यासाठी अॅम्ब्युलन्स मागीतली. यावेळेस पिडीत मुलीला गुंगीचे औषध देवून तिच्यावर अॅम्ब्युलन्समध्ये बलात्कार केला.

पिडीत मुलीच्या आईला तिच्यात शाररिक बदल जाणवले तेव्हा ती गर्भवती असल्याचं समोर आलं. कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More