Mirzapur Season 3 l लोकप्रिय क्राईम-ड्रामा सिरीज ‘मिर्झापूर’चे चाहते तिसऱ्या सीझनच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्मात्यांनी या सिरीजच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल बरेच दिवस कोडे ठेवले होते. मात्र अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. निर्मात्यांनी ‘मिर्झापूर 3’ वेबसिरीजची रिलीज डेट जाहीर केली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
‘मिर्झापूर 3’ ची रिलीज डेट जाहीर :
‘मिर्झापूर’ वेबसीरिजचे 2 सिझन चांगलेच हिट झाले आहेत. या क्राईम-ड्रामाच्या तिसऱ्या सीझनची जोरदार चर्चा आहे. चाहते त्याची रिलीज डेट जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत होते, मात्र यावेळी निर्मात्यांनी मिर्झापूर 3 च्या रिलीजच्या तारखेबाबत चाहत्यांचे कोडे सोडवले आहे. चाहत्यांच्या संयमाचा बांध फुटलेला पाहून अखेर या बहुप्रतिक्षित सिरीजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
‘मिर्झापूर 3’ वेबसिरीज 5 जुलैपासून प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम केली जाणार आहे. या सिरीजच्या रिलीजच्या तारखेची घोषणा करताना प्राइम व्हिडिओने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर सिरीजचे नवीन पोस्टर जारी केले आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मिर्झापूर सीझन 3 साठी व्यवस्था करण्यात आली आहे.
Mirzapur Season 3 l मिर्झापूर सीझन 3 मध्ये कोणते स्टार असणार :
मिर्झापूरचे पहिले दोन सिझन प्रचंड गाजले आहेत. या मालिकेत पंकज त्रिपाठी, दिव्येंदू, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी आणि अली फजल यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. संवादांपासून ते कथेपर्यंत, Amazon Prime Video च्या या मालिकेचे दोन्ही सीझन लोकांच्या मनात घर करून राहिले होते.
अशा परिस्थितीत आता चाहते वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत. तिसरा सीझनही त्याच्या दोन सीझनप्रमाणेच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो की नाही हे पाहणे बाकी आहे. आता चाहत्यांना मिर्झापूर 3 वेबसिरीज 5 जुलैपासून प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे.
News Title : Mirzapur Season 3 Release Date
महत्त्वाच्या बातम्या-
अजित ‘दादा’ धोक्यात!, शरद पवारांकडे पोहोचलेल्या कार्यकर्त्यांची मोठी मागणी
अब्दूला लग्नापेक्षाही ती गोष्ट फार महत्वाची; अब्दू रोजिकने लग्न पुढे ढकलण्यामागे हे आहे कारण
पैसे तयार ठेवा, या भन्नाट फीचर्ससह इलेक्ट्रिक कार लाँच होणार
महायुतीत असलो तरी शरद पवारांची विचारधारा सोडणार नाही; अजितदादा भावूक
राज्यातील विद्यार्थ्यांचा गणवेश ठरला! असा असणार शालेय गणवेश; वाचा संपूर्ण नियमावली