Top News अहमदनगर महाराष्ट्र

शरद पवारांच्या आत्मचरित्रात असत्य माहिती; बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्रात धक्कादायक आरोप

अहमदनगर | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्रात असत्य माहिती सांगितल्याचा आरोप पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी केला आहे. बाळासाहेब विखे यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. या आत्मचरित्रात यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे.

शरद पवार यांच्या राजकीय आत्मचरित्रात (पृष्ठ क्र.२०, २१) प्रवरा कारखान्याच्या उभारणीत अण्णासाहेब शिंदेंचा सहभाग असल्याचा उल्लेख आहे. मात्र ही माहिती असत्य असल्याचं बाळासाहेब विखे-पाटील यांनी लिहिलं आहे. माहितीचा स्त्रोत जर असत्यावर आधारित असेल तर तोच सत्य म्हणून पुढे पुढे येत राहतो. अशा असत्य माहितीची नोंद इतिहासात कधी कधी होते व तेच सत्य म्हणून स्वीकारलं जाण्याची शक्यता असते, असं बाळासाहेब विखे म्हणतात.

पुढे ते लिहितात, “वस्तुतः कारखान्याचा पहिला गळीत हंगाम १९५० साली सुरु झाला. अण्णासाहेब शिंदे १९५५ साली सभासद झाले, तर १९५७-५८ साली ते संचालक झाले. त्यानंतरच ते कारखान्यावर आले. मग त्यांचा कारखाना उभारणीत सहभाग कसा असेल? याचा अर्थ जाणीवपूर्वक असत्य माहिती पसरवून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातोय.”

दरम्यान, याच आत्मचरित्रात बाळासाहेब विखे पाटील यांनी अण्णासाहेब शिंदेबद्दलही अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. अण्णासाहेबांना कारखान्याचे अध्यक्ष बनण्याची महत्त्वाकांक्षा होती आणि त्यातून धनंजयराव गाडगीळांची बदनामी करणे, जातीयवादी वातावरण निर्माण करणे, अफवा पसरवणे असे प्रकार सुरु होते, असा उल्लेख त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भुजबळांनी माझं भाषण त्यांच्या नेत्यांसोबत बसून ऐकावं- खासदार संभाजीरीजे

‘हे’ राज्यात मोगलाई अवतरल्याचं लक्षण; चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

“जानेवारी 2021 मध्ये कोरोनाला हरवणारी एक नाही, तर अनेक लसी येणार”

कोरोना चाचणीचा अहवाल पॉसिटीव्ह; तरूणाची डॉक्टरला मारहाण

युवा सेनेची ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ विषयावर लघुपट स्पर्धा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या