बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मिस इंडिया 2022’ ठरलेल्या सिनी शेट्टीबद्दल जाणून घ्या सर्व काही

मुंबई। कर्नाटकच्या सिनी शेट्टीने मिस इंडिया 2022 चा किताब आपल्या नावावर केला. नेहमीप्रमाणे यंदाची स्पर्धाही कठीण असून 31 सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या सर्व सौंदर्यवतींना मागे टाकत सिनीने मिस इंडियाचं विजेतेपद मिळवलं.

राजस्थानची रुबल शेखावत ही मिस इंडिया 2022 ची फर्स्ट रनरअप ठरली. तर उत्तर प्रदेशची शिवाता चौहान सेकंड रनरअप ठरली. मिस इंडिया ठरलेल्या सिनी शेट्टीने यापूर्वीही एका स्पर्धेत मिस टॅलेंट पुरस्कार जिंकला आहे.

मुळच्या कर्नाटकच्या असलेल्या सिनीचं संपूर्ण बालपण मुंबईत गेलं. अवघ्या चार वर्षांची असताना सिनीने नृत्य करण्यास सुरवात केली असून ती एक उत्तम भरतनाट्याम नृत्यांगणा आहे. सिनी नुकतीच पदवीधर झाली असून ती आता सीएफएचा अभ्यास देखील करत आहे.

दरम्यान, मिस इंडिया स्पर्धेसाठी सिनी अनेक दिवसांपासून मेहनत घेत होती. सर्व स्पर्धकांना मागे टाकत सिनीने मिस इंडिया 2022चं विजेतेपद मिळवलं.  नेहा धुपिया, मलाइका अरोरा, डीनो मोरिया, राहुल खन्ना, रोहित गांधी आणि शामक डाबर या सहा जजेसने सिनीची मिस इंडिया 2022 म्हणून निवड केली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sini Shetty (@sinishettyy)

थोडक्यात बातम्या-

पावसाळ्यात ‘या’ सोप्या घरगुती उपायांसोबत घ्या तुमच्या त्वेचेची काळजी

‘काय ती शायरी, काय ती अदाकारी…’, चित्रा वाघ यांचा राऊतांना शहाजी बापू स्टाईल टोला

‘काली’ चित्रपट प्रकरणी भारतीय उच्चायुक्तालयाचा निर्मात्यांना दणका

शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, आमदारांपाठोपाठ नगरसेवकही शिंदे गटात

लालू प्रसाद यादव यांची तब्येत खालावली, महत्त्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More