पुणे | गेल्या आठवड्यापासून पुण्यातील कोरोना रुग्ण वाढीचा वेग घटला असून पुणेकरांना मोठा दिलासा मिळालाय. शहरात राबवण्यात आलेला ‘मिशन झिरो’ उपक्रम प्रभावी ठरतोय.
पुणे शहरातील वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स आणि महापालिकेतर्फे ‘मिशन झिरो पुणे’ उपक्रम राबवला जातोय. 23 जुलैपासून शहरातील 11 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत उपक्रमाला सुरुवात झाली.
शहरातील हॉटस्पॉटमध्ये ठरलेल्या भागात अधिकाधिक नागरिकांच्या तपासण्या करून रुग्ण शोधणं, रॅपिड ऍक्शन प्लॅन तयार करणं, फिरत्या दवाखाण्यांची संख्या वाढविणं, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करणं, रिपोर्ट लवकर उपलब्ध करून देणं तसंच पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार या सूत्रांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हा उपक्रम यशस्वी ठरतोय.
महत्वाच्या बातम्या-
भाजपचा सीबीआयवरही विश्वास उरला नसेल तर…- संजय राऊत
साडेसहा महिन्यांनी सलमानच्या ‘राधे’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात!
आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाडं फोडली नाही- यशोमती ठाकूर
कोरोना लस कधी मिळणार?; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती