बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निवडणुकीच्या प्रचारात भाजपने केली ‘ही’ घोडचूक; चूक समजताच व्हिडीओ हटवला

चेन्नई | सध्या भारतात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालू आहे. भाजपने या निवडणुकीत संपूर्ण ताकद लावली आहे. भाजपकडून प्रचारासाठी वेगवेगळे पर्याय वापरले जात आहे. तमिळनाडूच्या एका प्रचारादरम्यान भाजपच्या आयटी विभागाकडून ‘कमळ उगवेल’ या शिर्षकाचं एक गाणं तयार केलं गेलं. पण त्या गाण्यात काँग्रेस नेत्याच्या सुनेचा व्हिडीओ आल्यानं भाजपची चांगलीच फजिती झाल्याचं दिसून आलं आहे.

तमिळनाडूच्या भाजपने एम करूणानिधी यांनी लिहिलेल्या गीतांचा वापर करून एक व्हिडीओ बनवला. या व्हिडीओमध्ये करूणानिधी यांचं ‘सेममोझी’ हे गाणं वापरण्यात आलं होतं. या गाण्यात त्यांनी काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांची सुन श्रीनिधी यांच्या नृत्याचा काही भाग या गाण्यात टाकला. आणि या गाण्याचा संगीतमय व्हिडीओ रविवारी भाजपने पोस्ट केला. ही गोष्ट श्रीनिधी यांच्या वेळीच लक्षात आली.

भाजपने त्यांच्या अपप्रचारासाठी माझ्या छायाचित्रासाठी वापर करणं हे हास्यास्पद आहे, असं श्रीनिधी म्हणाल्या. तमिळनाडूत कमळ कधीही उगवणार नाही असं म्हणतं त्यांनी भाजपच्या संबंंधीत अकाऊंटला टॅग केलं. ही घोडचूक भाजपच्या लक्षात आल्यावर भाजपने तो व्हिडीओ काढून टाकला.

दरम्यान, परवानगी शिवाय फोटो आणि छायाचित्र वापरता येत नाही, असा टोला काँग्रेसने भाजपला लगावलाय. श्रीनिधी या भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. सुमारे 10 वर्षांपुर्वी पारंपारिक तमीळ परिषदेच्या एका कार्यक्रमात त्यांनी हा नृत्य आविष्कार सादर केला होता. त्याचीच ही व्हिडीओ क्लिप होती असं सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

परिणीती चोप्राने शेअर केला टाॅपलेस फोटो, चाहते म्हणाले…

“भाजपने संपूर्ण ताकद लावली तरी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल”

कोहलीच अव्वल! एकदिवसीय सामन्यात विराटची रँकिंग नंबर 1

‘मी बोरिस जॉन्सन यांच्यासोबत अनेकदा शरीरसंबंध ठेवलेत’; ब्रिटनच्या पंतप्रधानांबाबत महिलेचा मोठा गौप्यस्फोट

‘हा केवळ अर्थमंत्र्यांचा प्रॉब्लेम आहे, की…’; सुब्रमण्यम स्वामी मोदी सरकारवर बरसले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More