मुंबई | मराठी सिनेसृष्टीत गाजलेली अभिनेत्री मिताली मायेकर हीने 2009 मध्ये बाॅलिवूड चित्रपट ‘बिल्लू’ मधून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर ऊर्फी, यारी दोस्ती, अशा अनेक चित्रपटांसोबतच असंभव, उंच माझा झोका, अशा अनेक मराठी कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे.
लग्नानंतर मिताली मायेकर आणि सिद्धार्थ चांदेकर लोणावळा येथे गेले होते. यादरम्यान बाथटबमध्ये इंजोय करत असतानाचा फोटो मितालीने शेअर केला आहे.
विशेष म्हणजे हा फोटो सिद्धार्थने काढला असून ‘बबली ब्लँकेट’, असं मितालीने याला कॅपशन दिलं आहे.
काहीदिवसांपूर्वीच मितालीने सिद्धार्थ चांदेकरसोबत लग्न गाठ बांधली आहे. लग्नानंतर अजूनसुद्धा मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. लग्नात मितालीने पारंपारीक मराठीमोळा लुक केला असून तिने हिरवी नऊवारी साडी नेसली होती.
याआधी सुद्धा मितालीने मचान येथेच बाथटबमध्ये फोटोशूट केला होता. मात्र या फोटोंमध्ये तिने क्रीम कलरचा गाऊन परिधान केला होता.
थोडक्यात बातम्या-
आंतरजातीय लग्नाबद्दल हायकोर्टाने दिला ‘हा’ ऐतिहासिक निकाल!
“संजय राठोडांची अवस्था ‘सामना’मधल्या भेदरलेल्या सरपंचासारखी”
‘4 नाही, तर 40 लाख ट्रॅक्टर घेऊन तयार राहा’; राकेश टिकैत आक्रमक
“…तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत”
Comments are closed.