माझा शेवटचा विश्वचषक, पुढच्या विश्वचषकात नसेन!

लंडन | हा माझा शेवटचा विश्वचषक होता, पुढच्या विश्वचषकात मी नसेन, असं भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं स्पष्ट केलं. महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर ती बोलत होती.

निवृत्तीबाबत किंवा संघाचं कर्णधारपद सोडण्याबद्दल मितालीनं कुठलंही भाष्य केलं नाही. 

दरम्यान, सामन्यात महत्त्वाच्या वेळी संघ दबावात आला आणि मागोमाग विकेट गमावल्या. त्यामुळेच आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला, असं ती म्हणाली. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या