मुंबई | मिठी नदीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पत्नीसोबत एका गाण्यावर थिरकल्याचं आपण नुकतंच पाहिलं, मात्र मिठीची अवस्था अजूनही गलिच्छ म्हणावी अशीच आहे. बीकेसी भागात श्रीमंत लोक राहतात त्याच भागात नदी स्वच्छ करण्यात आलीय, तर कुर्ल्यात मात्र नदी अजूनही अस्वच्छ आहे.
राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी याप्रकरणी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे, तसेच त्या उपोषणाला बसल्या आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी याप्रकरणी ट्विट करुन मिठीचं मरण समोर आणलं आहे.
जाहिरातबाजी तर झाली, मात्र मिठी नदी स्वच्छ कधी होणार? असा प्रश्न आता विचारला जातोय.
मिठी नदीला अद्याप अच्छे दिन आले नाही,BMC व MMRDA एकमेकांवर जबाबदारी ढकलताहेत.आज @NCPspeaks नगरसेविका @drsaeedakhan14 याचं मुद्द्यांवर आयुक्त कार्यालया बाहेर उपोषणाला बसल्या आहेत. मुंबईच्या नद्या वाट पहाताहेत कधी स्वच्छ करणार आयुक्त साहेब ??@supriya_sule @Jayant_R_Patil @MCGM_BMC pic.twitter.com/HMWqc1FsTZ
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 16, 2018
नदी संरक्षण गाण्यात @MCGM_BMC आयुक्तांना खुद्द @CMOMaharashtra सोबत थिरकतांना मुंबईकरांनी पाहिलं पण अजुनही मुंबईच्या नदींची अवस्था बिकट आहे,श्रीमंतBKC कडील मिठी साफ तर कुर्ल्याकडे कचर्याचा ढीग. @supriya_sule @Jayant_R_Patil @nawabmalikncp @AhirsachinAhir @iamvmahadeshwar pic.twitter.com/tDZMMOQ8Uu
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 16, 2018
काय होतं गाणं???
महत्त्वाच्या बातम्या –
-कर्नाटकच्या त्रांगड्यावर प्रमोद महाजनांचं जुनं भाषण व्हायरल
-राज्य सरकारची मेगा भरती; 72 हजार जागा भरणार
-भाजपचं ‘ऑल सेट’; येडियुरप्पा उद्या दुपारी 12.30 वाजता शपथ घेणार?
-राज्यपालांकडून येडियुरप्पांना निमंत्रण, मात्र राहू काळ संपल्यानंतर….
-“भाजपकडून आमदारांना प्रत्येकी 100 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर”
Comments are closed.