“मी कधीही विचार केला नव्हता की देशातील सर्वात मोठ्या नेत्यासोबत बसायला मिळेल”
कोलकाता | बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा फडकावत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. मागील अनेक दिवसांपासून मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर आज या चर्चांणा पुर्णविराम मिळाला आहे. याआधी ते तृणमूलचे राज्यसभेचे खासदार होते. मात्र त्यांनी पक्षप्रवेश करताच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला.
कुणी जर हक्क हिसकावून घेत असेल त्याच्या हक्कासाठी उभा राहिल. मी कोब्रा आहे. मी चावलो तर तुम्ही फोटोसारखेच होणार. माझा एक दंशही पुरेसा आहे, असं म्हणत मिथुन चक्रवर्तींनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली. त्यासोबतच मी बंगाली आहे आणि जो कुणी इथे वाढला आहे, त्याचा भूमीवर अधिकार आहे. मी ग्वाही देतो की, पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हक्कासाठी मी लढेल, असंही मिथुन चक्रवर्ती म्हणाले.
मी मूळचा उत्तर कोलकातातील जोराबागन या एका छोट्या परिसरातला आहे. माझं एक स्वप्न होतं की, खूप मोठं व्हावं. पण ते पूर्ण होऊ शकलं नाही. मी याचीही कधी कल्पना केली नव्हती की पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील सर्वात मोठ्या नेत्यासोबत व्यासपीठावर बसण्याची संधी मिळेल, असं मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकींचं बिगुल वाजलं असून 27 मार्चसून मतदानाला सुरवात होणार आहे. तृणमूल काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपकडून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. यावेळी मोदींनी आपल्या भाषणातून ममता बॅनर्जींवर निशाणा साधला.
I once dreamt of doing something big in life but I never dreamt of being on a platform where such big leaders and the leader of the biggest democracy, Prime Minister Narendra Modi ji will be present: BJP leader Mithun Chakraborty at Brigade Parade Ground in Kolkata pic.twitter.com/72zTKuGfr2
— ANI (@ANI) March 7, 2021
थोडक्यात बातम्या-
राज ठाकरेंच्या पत्रानंतर ‘नाणार’वासीय म्हणतात; ‘गुजराती मारवाड्यांच्या गुंतवणुकीत अडकलेला पैसा….’
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘या’ तारखेला अन्नत्याग आणि पदयात्रा
‘ही तर सर्व बेबी पेंग्विनची नाईटलाईफ गॅग…’;नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा’
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावणं अशक्य- नवाब मलिक
मिथुन चक्रवर्ती अखेर ‘भाजप’च्या वाटेवर; कोलकाताच्या रॅलीत केला पक्षप्रवेश…
Comments are closed.