बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत योग्य?”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून कोकणाला पावसाने झोडपून काढलं होतं. त्यामुळे कोकणातील तळिये गावात दरड कोसळुन झालेल्या दुर्घटनेत 80 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आता राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तळिेये गावच्या दौऱ्यावर आहेत. त्यावरून आता राष्ट्रवादीने राज्यपालांवर टीका केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सोबत भाजपचे आमदार आशिष शेलार देखील आहेत. त्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. ‘राज्यपाल महोदय आज आशिष शेलार यांना तळीये गावात सोबत घेऊन का गेले असावेत?. राज्यपाल या महत्त्वाच्या पदावर असताना सुद्धा भाजपचे आमदार सोबत घेऊन शासकीय दौरा करणे हे कितपत योग्य?, असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

तुम्ही राज्याचे आहात की भाजपचे, ते तरी सांगुन टाका एकदा, असंही मिटकरी यांनी म्हटलं आहे. महामहिम राज्यपाल हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत की भाजपाचे याबाबत महाराष्ट्राच्या जनतेत संभ्रम आहे. गरज नसताना आशिष शेलार यांना सोबत नेणे हे राज्यपाल शिष्टाचारात बसणारे नाही. राज्यपालांनी घटनेचा अभ्यास करून स्वतः अधिकार समजून घ्यावेत, असा सल्ला देखील मिटकरी यांनी राज्यपालांना दिला आहे.

दरम्यान, पाच दिवसांपुर्वी तळीये गावात दरड कोसळून 35 घरं जमिनदोस्त झाली होती. त्यात एकूण 80 जणांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली होती. तर 32 नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. दरड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गावाचं पुनर्वसन करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

महापुरामुळे चिंताग्रस्त असलेल्या शरद पवार यांची तातडीची पत्रकार परिषद

‘लवकरच तो दिवस उगवेल’;संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा

अरे देवा! मंदिरात जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीत कोरोनाही चिरडुन गेला, पाहा व्हिडीओ

सकारात्मक बातमी! सोमवारी देशात मागच्या 100 दिवसातील सर्वात कमी कोरोना रूग्णांची नोंद

पुरात अडकलेल्या कोरोना रूग्णाच्या मदतीसाठी सरसावले एनडीआरएफचे जवान, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More