बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उंटाच्या तोंडाचा मुका घ्यायची धडपड करू नका, आम्ही चंपा बोललो तर तुमचं मानसिक संतुलन ढासळतं”

मुंबई | अजित पवारांनी झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. याला आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटलांनी कुंभकर्णासारखं बरळु नये. आम्ही चंपा बोललो तर तुमचं मानसिक संतुलन ढासळतं. अजितदादा किती तास झोपतात आणि जागतात हे संपुर्ण राज्याला माहिती आहे. उगाच उंटाच्या तोंडाचा मुका घ्यायची धडपड करू नका, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

पुण्यात कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असताना पालकमंत्री जिल्ह्याला वेळ देत नाहीत. फोनवरही ते नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं. पुणे जिल्ह्यात लक्ष घालायला त्यांना वेळ नसेल तर पुण्याचा पालकमंत्री बदलावा, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

दरम्यान, अजित पवार यांनी मला ‘चंपा’ बोलणं थांबवावं अन्यथा मी तुमच्या मुलांपासून सर्वांचे शॉटफॉर्म करेन, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना दिला होता. त्यानंतर देखील आता अमोल मिटकरी यांनी चंपा शब्दाचा पुन्हा वापर करत चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

“अजित पवारांनी झोप कमी करून पुण्याकडं लक्ष द्यावं, अन् झेपत नसेल तर…”

“सरकारी तिजोरीतून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अमोल कोल्हे यांनी ज्ञानामृत पाजावं”

धक्कादायक! नाशिकमध्ये चक्कर येऊन एकाच दिवशी 11 जणांचा मृत्यू

तिसरं मुल जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात पाठवा- कंगणा रणावत

‘मी देशासाठी मरतोय, पण…’; पत्नीला बेड न मिळाल्याने BSF जवानाचा आक्रोश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More