मी बंड केले तर तुम्हाला थंड केल्याशिवाय राहणार नाही; गोटेंचा भाजपला इशारा

धुळे | मी बंड केले तर तुम्हाला थंड केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजप आमदार अनिल गोटे यांनी भाजपलाच दिला आहे. मात्र मी पक्ष सोडून कुठेच जाणार नाही, असंही ते म्हणाले.

कुठल्याही स्थितीत गुंडापुंडांना उमेदवारी देऊ देणार नाही. पक्षातील नेत्यांनी उमेदवार निवडीबाबत चुकीचा निर्णय घेऊ नये. असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, धुळे महापालिका निवडणुकीची सर्व सूत्रे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली आहेत. त्या आमदार गोटे हे भाजपवर नाराज झाल्याचं बोललं जातं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आई म्हणाली, “वेळ पडली तर राजकारण सोड, मात्र पवार साहेबांना सोडू नको”

-आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा दांडिया डान्स; पाहा व्हिडिओ

-गर्दी पाहून धक्का बसला वाटतं; थोडी चिक्की खा, बरं वाटेल -रुपाली चाकणकर

-अहो आश्चर्यम्! माहितीच्या अधिकारातून मागवली चक्क श्रीकृष्णाबद्दल माहिती

-मोदी स्वतः खात नाहीत, पण दुसऱ्याला खायला लावून त्यात हिस्सा मागतात!