Top News महाराष्ट्र मुंबई

“गुडघ्यात मेंदू असलेलं सरकार सत्तेवर असले की असे प्रकार घडतात”

मुंबई | गुडघ्यात मेंदू असलेले सरकार सत्तेवर असले की असे प्रकार घडतात. जनतेची विटंबना, वेळेचा अपव्यय, पैशाचा चुराडा आणि अब्रूचे खोबरे हीच महाविकास आघाडी सरकारची खरी कमाई, अशी टीका भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

मुंबई उच्च न्यायालायने कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र विरोधकांनी यावरून ठाकरे सरकारला घेराव घातला आहे. भाजपकडून जोरदार टीका ठाकरे सरकारवर होत आहे.

एमएमआरडीएला उच्च न्यायालायने काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तर काम ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत ठेवण्यास सांगितलं आहे. याबाबतची फेब्रुवारीत अंतिम सुनावणी सुरु होणार आहे.

दरम्यान, मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं काम केलं जात आहे. सरकार या कामात जेवढा उशीर करेल तितकी त्या प्रकल्पाची किंमत वाढत जाणार आहे. उशीर झाला तर दिवसाला सर्व मिळून पाच कोटी रूपयांचं नुकसान होत असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

पक्षवाढीसाठी चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला!

“ओवैसीला विकत घेऊ शकेल असा अजुन कोणी जन्माला आलेला नाही

“लोकसभा निवडणूक एकहाती जिंकूच, पण विधानसभेतही आमचा विजय निश्चित”

कोरोनाचं पहिलं लसीकरण ‘या’ राज्यात होणार सुरु; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

“टू मच डेमोक्रॉसी”, म्हणत उर्मिला मातोंडकरांची मोदी सरकारवर जोरदार टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या