Top News महाराष्ट्र मुंबई

‘…तर उद्या विधानसभा बरखास्त करून राज्यात निवडणुका घ्या’; भाजपचं राष्ट्रवादीला आव्हान

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर देत विधानसभा बरखास्त करण्याचं आव्हान केलं आहे.

राज्यात आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र लढवली तर भाजपला 50 पेक्षा जास्त जागा जिंकता येणार नाहीत, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. पाटलांच्या या टीकेला भातखळकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

दगाबाजांबरोबर आघाडी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी अशा वल्गना करू नये. जयंत पाटील भाजपच्या पराभवाबाबत इतके आश्वस्थ आहात तर उद्या विधानसभा बरखास्त करून राज्यात निवडणुका घ्या.  दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ देत, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अतुल भातखळकरांनी केलेल्या या टीकेवर जयंत पाटील काय म्हणतात?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

…म्हणून रानगव्याचा मृत्यू झाला; वनविभागातील अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

….म्हणून अमेरिकेत लोकांना कोरोना झाला हे बरं झालं- डोनाल्ड ट्रम्प

‘आज शिर्डीतील ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणारच’ तृप्ती देसाईंचा निर्धार

आधीच स्क्रिनवर 15 सेकंदाचा रिप्ले दाखवणं महागात पडलं; ‘त्या’ निर्णयावर कोहली नाराज

कोरोना लसीबाबतची ‘ती’ बातमी खोटी; आरोग्य मंत्रालयाने केलं स्पष्ट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या