बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते हे जगाला ठाऊक पण रामकार्यात तंगड घालाल तर…”

मुंबई | अयोध्येतील राम मंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने जमीन खरेदी करताना घोटाळा झाल्याच आरोप केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आम आदमी आणि समाजवादी पक्षाने हे आरोप केले असून ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेवरून भाजपनेही शिवसेनेवर टीकस्त्र सोडलं आहे.

दोन कोटींची जमीन अवघ्या पाच मिनिटांत 18.5 कोटी रुपयांना ट्रस्टने खरेदी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी ‘आप’चे खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केली आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी खुलासा करावा, असं संजय राऊत म्हणाले. यावरून भातखळकरांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

राम मंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस, शिवसेना आदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झाले आहे. सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा. जय श्रीराम, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भातखळकरांनी याबाबत ट्विट केलं आहे.  त्यामुळे अतुल भातखळकरांच्या टीकेला शिवसेना प्रत्युत्तर देणं हे महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-  

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ चित्रांचा शोध; तीन शिवकालिन चित्र परदेशातील संग्रहालयात

“संभाजीराजे राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रण देतो, तुम्ही उद्याच मुंबईला या!”

‘…त्यामुळे उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारलं’; हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरात कबुली

‘या’ देशात तब्बल 900 लोकांना एक्सपायर झालेल्या कोरोना लसीचे डोस

कडक सॅल्युट! हाताला सलाईन असतानाही शिवसेनेचा ‘हा’ खासदार मराठा आंदोलनाला हजर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More