मुंबई | उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात 20 वर्षीय युवती सामूहिक बलात्काराची शिकार झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधानसभेचे आमदार भाई जगताप यांनी अभिनेत्री कंगणा राणावत आणि पत्रकार अर्णव गोस्वामींवर निशाणा साधला आहे.
युपी मध्ये झालेला गँगरेप महाराष्ट्रात झाला असता तर आम्ही तांडव केला असता. आता आम्ही काहीच बोलणार नाही कारण आम्ही भाजपला विकले गेलेलो आहोत, असं भाई जगताप यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये बलात्कार केलेल्या आरोपींना गोळ्या घालाव्यात, असं कंगणाने म्हटलं आहे.
युपी मध्ये झालेला गँगरेप महाराष्ट्रात झाला असता तर आम्ही तांडव केला असता
आता आम्ही काहीच बोलणार नाही कारण आम्ही भाजपाला विकले गेलेलो आहोत
@गोदी मीडिया pic.twitter.com/TWFHmq02JN
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) September 30, 2020
महत्वाच्या बातम्या-
सीबीआय देखील आता हिंदुत्वाचे हत्यार बनलं आहे- अबू आझमी
“पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहा आणि स्मृती इराणींना न्याय कंगणाला द्यायचाय सर्वसामान्यांना नाही”
“भारतमातेच्या मुलीची बलात्कार करून हत्या, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा”
मुंबईची तुलना पाकिस्तानशी करणारी कंगणा हाथरसच्या बलात्कार प्रकरणावर म्हणाली…