पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे आमदार आणि चंद्रकांत पाटलांचा एकत्रित विमानप्रवास! चर्चांना उधाण

पुणे |  इंदापुरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याबरोबर मुंबई ते पुणे असा एकत्रित विमान प्रवास केला.

या प्रवासानंतर राजकीय चर्चांना ऊत आला. त्याचं कारणही तसंच आहे… इंदापुरची जागा सध्या काँग्रेसकडे आहे मात्र या जागेवर आत्ता दत्तात्रेय भरणे यांच्या रूपाने राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले आहेत. याच जागेवरून सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत आहे.

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांंनी आधीपासून या जागेवर आपला हक्क सांगितला आहे मात्र ही जागा सोडण्यास राष्ट्रवादी तयार नाहीय. अशातचं भरणे यांचा भाजपच्या नेत्यांशी एकत्रित विमानप्रवास हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.

दरम्यान, या प्रवासात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असं आमदार भरणे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

अण्णांनी केली जग सोडून जाण्याची भाषा, गाव ढसाढसा रडलं…

-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वाधिक धर्मनिरपेक्ष संघटना- राज्यपाल सी. विद्यासागर राव

-“आर. आर. आबा असते तर अण्णांना इतके दिवस उपोषण करावं लागलं नसतं”

आमचं दैवतचं उपाशी मग आम्ही कसं खाणार??, राळेगणमधल्या मुलाची भावनिक प्रतिक्रिया

नांदेडची स्वराली जाधव ठरली ‘सूर नवा-ध्यास नवा’ची महाविजेती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या