Top News

‘या’ आमदाराला ED चा मोठा दणका; तब्बल 255 कोटींची संपत्ती जप्त

बीड | रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रत्नाकर गुट्टेंची गंगाखेड शुगर्सची 225 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या नावे कर्ज लाटल्याचा आरोप रत्नाकर गुट्टे यांच्यावर आहे. शेतकऱ्यांच्या नावे कर्ज लुटून ती रक्कम आपल्या कंपनीत गुंतवल्याचाही गुट्टेंवर आरोप ठेवण्यात आलाय.

शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज घेऊन गुट्टे यांनी आपल्या विविध कंपन्यात गुंतवणूक केली असून, गंगाखेडमध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी आमदार रत्नाकर गुट्टे यांना अटकही झाली होती.

दरम्यान, गंगाखेड शुगर कारखान्याने शेतकरी सभासदांच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर 328 कोटी रुपयांचे पीक कर्ज घेतल्याचे खंडपीठात सांगण्यात आले होते. यूको, आंध्रा, सिंडिकेट अशा नागपूर, नांदेड, परभणी येथील शाखेतून कर्ज घेतले होते. 2017 साली गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

थोडक्यात बातम्या-

“जीडीपी 10 % वाढेल, हा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे ठरू नये”

सरनाईक यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता; पुरावे घेऊन किरीट सोमय्या थेट ED कार्यालयात

भाजप कार्यकर्त्यांवर पुन्हा हल्ला; व्हीडिओ शेअर करत कैलास विजयवर्गीय यांनी मततादीदींना सुनावलं

‘आता लव्ह लेटर पाठवू नका’; शेतकऱ्यांनी मोदी सरकारला सुनावलं

पंकजा मुंडेंच्या ताब्यातील वैद्यनाथ साखर कारखान्यात चोरी; ‘इतक्या’ लाखांचं साहित्य लंपास

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या