भाजपचा आमदार बसला विरोधी बाकावर, पुढे काय घडलं?

Maharashtra Assembly Session l विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता आली आहे. अशातच 5 डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा देखील पार पडला आहे. मात्र आता त्यानंतर आजपासून विशेष अधिवेशनाला सुरवात झाली आहे. या अधिवेशनात नव्या आमदारांचा शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी या आमदारांना हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे शपथ देणार आहेत.

भाजपचे नेते चुकून विरोधी बाकावर बसले :

अशातच पहिल्याच दिवशी विरोधकांनी सभात्याग केल्याचं दिसून आलं आहे. कारण विरोधक ईव्हीएमचा निषेध नोंदवत आज शपथ घेणार नसल्याचं म्हटलं आहे. तसेच या अधिवेशनावेळी सभागृहात 288 आमदारांना हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे आज आणि उद्या शपथ देणार आहेत. यामध्ये 78 नव्या आमदारांचा समावेश आहे.

मात्र यावेळी पहिल्यांदाच आमदार झालेले अनेक आमदार आज शपथ घेणार आहेत. तसेच पहिल्यांदाच आमदार झालेले भाजपचे एक दिग्गज नेते चुकून विरोधी बाकावर बसले होते. मात्र यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हे दिसताच त्यांनी नवनिर्वाचित आमदाराला हाताला धरून सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसवल्याची घटना घडली आहे.

Maharashtra Assembly Session l नेमकं काय घडलं? :

दरम्यान, विधानसभेच्या सभागृहात पहिल्यांदाच आमदार म्हणून आलेले हेमंत रासने हे विरोधी पक्षाच्या बाकांवर बसले होते. मात्र ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आली. त्यावेळी अजित पवार यांनी हेमंत रासने यांच्या हाताला धरून बाजूला आणलं आणि सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसवलं. पहिल्यांदाच आमदार झालेले हेमंत रासने हे पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला आहे.

तसेच विरोधी पक्षाच्या आमदारांनी पहिल्या दिवशी सभात्याग केल्याचं दिसून आलं आहे. मात्र यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित आर पाटील हे देखील सभागृहात होते. त्यामुळे त्यांना पाहताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे.

News Title –mla hemant rasane seat onopposition bench

महत्त्वाच्या बातम्या-

बापरे! …असं न केल्यास शाळांवर होणार मोठी कारवाई

थर्टी फर्स्ट डिसेंबर साजरा करण्यापूर्वी ही बातमी वाचाच!

राज्यावर पावसाचं सावट; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

खातेनाट्याला पुन्हा सुरुवात, गृहखात्याच्या बदल्यात शिंदेंसमोर भाजपाकडून ‘हे’ 3 पर्याय?

‘त्या’ प्रकरणी शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांना मोठा दिलासा!