MLA Injured l खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी शनिवारी अंबरनाथमध्ये (Ambernath) विकासकामांची पाहणी करण्यासाठी दौरा केला. या दौऱ्यात त्यांच्यासोबत सहभागी झालेले कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे (MLA Rajesh More) हे गटार ओलांडताना पडले, आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली.
अंबरनाथ क्रीडा संकुल परिसरामध्ये ही दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शनिवारी कल्याण लोकसभा मतदारसंघात विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे अंबरनाथ शहरात होते. अंबरनाथ शहरात क्रीडा संकुल, नाट्यगृह, शाळा आणि शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पाच्या कामाची पाहणी यावेळी करण्यात आली.
नेमके काय घडले :
अंबरनाथ (Ambernath) पश्चिमेच्या नेताजी मार्केट परिसरातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची (sports complex) पाहणी सुरू असताना हा प्रकार घडला. खासदार (MP) शिंदे मैदानाच्या आतमध्ये पाहणी करत असताना, आमदार (MLA) मोरे हे मैदानाच्या बाहेरील बाजूस उभे होते.
तेथून ते मैदानात येण्यासाठी निघाले असता त्यांच्यासोबत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक (PA) देखील होते. मात्र, तीन फूट रुंदीच्या गटारावरून उडी मारताना मोरे यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले, त्यात त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.
News title : MLA Injured During MP’s Ambernath Visit