बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हे बालिशपणाचं लक्षण, आपला बाप आजारी असताना…”, आव्हाड संतापले

मुंबई | आज विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला  (Winter Session)  सुरूवात झाली आहे. या अधिवेशनात भाजप आणि भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यात चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थितीत राहिल्याने भाजपने उद्धव ठाकरेंवर खोचक टीका करण्यास सुरूवात केली आहे. त्यावर आता राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत.

विधानसभेच्या सदनाबाहेर पत्रकरांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी आव्हाड संतापल्याचं पहायला मिळालं. कोणाच्या तरी आजारपणावर टीका करणं हे राजकीय प्रगल्भता नसल्याचं उदाहरण आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पाऊण तास बोलत होते, असं आव्हाड म्हणाले आहेत.

आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो काय? आपली ती संस्कृती आहे का?, असा संतप्त सवाल आव्हाडांनी विचारला आहे. आजारपण नैसर्गिक आहे. कोणीही स्वत:हून नाटक करत नसतो, असंही आव्हाड म्हणाले आहेत. हे विकृतीपणाचं आणि बालिशपणाचं लक्षण आहे, असंही आव्हाड म्हणाले.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज आदित्य ठाकरे यांच्याकडे द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावरून भाजप आमदारांनी देखील वक्तव्ये केली आहे. त्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्रीपदाचा कारभार अजित पवारांकडे द्या”

“भास्कर जाधवांनी सभागृहात नौटंकी करण्यापेक्षा…”

‘ही महाराष्ट्राची परंपरा नाही’; सभागृहातच अजित पवारांनी भास्कर जाधवांना सुनावलं

मोदींची नक्कल, भाजपचा राडा अन् भास्कर जाधवांनी मागितली बिनशर्त माफी

“भाजप अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More