मुंबई | ह. भ. प. इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांना चांगलच धारेवर धरलं जात असल्याचं दिसत आहे. अशातच इंदुरीकर महाराजांचं म्हणजे कीर्तन कमी अन् तमाशा अधिक असतो, अशी टीका लोकभारतीचे आमदार कपील पाटील यांनी केली आहे.
इंदुरीकर महाराज याआधी शिक्षक होते. ते शिक्षकी पेशा सोडून कीर्तन करायला लागले. मला वाटलं कीर्तन बरं करतील. गाडगेबाबांच्या मार्गाने जातील. पण तसं काहीच दिसलं नाही. उलट माझ्या आजवरच्या अनुभवानं मला त्यांच्या कीर्तनात कीर्तन कमी आणि तमाशा जास्त असल्याचं कपील पाटील यांनी म्हटलं आहे.
इंदुुरीकर महाराज आपल्या कीर्तनात शिक्षकांची खिल्ली उडवतात याचं मला काही आश्चर्य वाटत नाही. त्यामुळे त्यांना जास्त काही सिरीअस घेऊ नका. लोकही घटकाभरच्या करमणुकीसाठी येत असल्याचाही टोला कपील यांनी लगावला.
दरम्यान, काही राजकीय पक्षाचे नेते महाराजांना समर्थन देत आहेत तर काही पुरोगामी विचारांचे नेते महाराजांवर टीकेचे बाण सोडत आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
आगीची माहिती मिळताच अजितदादा घटनास्थळी; स्वत: दिल्या सूचना
वारकरी संप्रदाय संपवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा डाव; इंदुरीकर प्रकरणावरून भाजपचा गंभीर आरोप
महत्वाच्या बातम्या-
आगीची माहिती मिळताच अजितदादा घटनास्थळी; स्वत: दिल्या सूचना
वारकरी संप्रदाय संपवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा डाव; इंदुरीकर प्रकरणावरून भाजपचा गंभीर आरोप
“सत्ता गमवल्याच्या झटक्यातून फडणवीस आणखी बाहेर आले नाहीत”
Comments are closed.