पुणे | पुण्यातील भाजपच्या (BJP) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचं निधन झालं आहे. त्या अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होत्या.
गेल्या काही काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
मुक्ता टिळक यांनी पु्ण्याचे महापौर पदही त्यांनी भूषवलं होतं. त्या आधी पुण्याच्या अडीच वर्ष महापौर होत्या. मुक्ता टिळक यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात नगरसेवक या पदावरुन केली. त्या चार वेळा पुणे महापालिकेत भाजपच्या नगरसेवक होत्या.
राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी ऍम्ब्युलन्समध्ये जाऊन मतदान केले होते. त्यावेळी त्यांच्या पक्षनिष्ठेची मोठी चर्चा झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या-