बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रडू नको बाळा आम्ही आहे ना इथं”, खचलेल्या तरुणाला निलेश लंके यांचा धीर

अहमदनगर | कोरोनाची वाढती संख्या पाहता आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने तब्बल 1100 बेड्सचे कोविड सेंटर उभारलं आहे. लंके यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या या सेंटरमध्ये जेवणाची तसेच उपचाराची सोय देखील करण्यात आली आहे. त्यांच्या या कामाची महाराष्ट्राभरात चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा निलेश लंके चर्चेचा विषय ठरले आहेत.

फलटनच्या एका तरुणाच्या नातेवाईकाला कोरोना झाला होता. त्या तरूणाने अनेक प्रयत्न करून पाहिले, परंतू त्याला फलटणमध्ये बेड मिळाला नाही. शेवटी त्याने निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरची वाट पकडली. त्यावेळी त्याला रडू देखील कोसळलं होतं. आमदार लंकेंनी त्याची भेट घेतली. “कुठून आला तू?”, असा प्रश्न त्यांनी तरूणाला केला. त्यावेळी त्यांनी फलटणवरून आल्याचं सांगितलं.

“रडला का तू?”, असं देखील त्यांनी तरूणाला विचारलं. त्यावरून त्या तरूणाला आणखी रडू कोसळलं. लंके यांनी त्याच्या पाठीवर हात ठेऊन त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. “अरे रडू नको बाळा, आम्ही आहे ना इथं”, असं लंके त्या खचलेल्या तरूणाला म्हणाले. “काही खाल्लं का तू?”, असा आपुलकीचा सवाल देखील त्यांनी त्या तरूणाला केला. तेव्हा त्याने होकारार्थी उत्तर दिलं.

दरम्यान, निलेश लंके यांनी त्यांचे सहाय्यक नितीन यांना सांगून त्या तरूणाला खायला देण्यास सांगितलं. त्याचबरोबर त्यांचे पेशंट कुठे आहेत ते बघुन त्या पेशंटने काही खाल्लं का ते पाहण्यास देखील सांगितलं. संकटाच्या काळात आमदार निलेश लंके लोकांची मदत करत आहे. त्यामुळे अहमदनगरच्या लोकांना त्याचा भरपूर आधार मिळताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील ‘हे’ शहर कोरोनामुक्तीच्या वाटेवर; रूग्णसंख्येत लक्षणीय घट

आरोग्यमंत्र्यांनी महिनाभरात लसीचा दुसरा डोस घेतलाच कसा?; राजेश टोपेंनी सोडलं मौन, म्हणाले…

मोठी बातमी! ‘इतक्या’ दिवसात चालू होणार लहान मुलांवरील कोव्हॅक्सिनची चाचणी

“केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी सुरू करून दाखवावेत”

मन सुन्न करणारी घटना! नवजात बालकाचा उंदराने कुरतडला पायाचा अंगठा, रूग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More