बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वत:ला ग्रेट दाखवायची धडपड! राष्ट्रवादीच्या आमदाराचं थेट कोरोना रुग्णासोबत फोटोसेशन

अहमदनगर | आजकाल राजकीय नेत्यांनी आपण भेट दिलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीची माहिती सोशल मीडियावर टाकून लोकांना आपल्या दौऱ्याबाबत माहिती देणं आणि प्रसिद्धी मिळवणं मोठ्या प्रमाणात सुरू केलं आहे. असंच काहीसं राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे.

निलेश लंके यांनी थेट कोरोना रुग्ण भरती असलेल्या वॉर्डात जाऊन आपल्या मायबाप जनतेशी संवाद साधला. एवढच नाही तर आमदार साहेबांनी तिकडे आपल्या मोबाईलमध्ये कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या रुग्णांसोबत सेल्फीदेखील काढला. आता हा जनतेबद्दलचा कळवळा की, प्रसिद्धीसाठी केलेला एक स्टंट असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच सरकारकडून अनेक निर्बंध लागू केले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार कोरोना वार्डात पोहोचले तेव्हा त्यांच्या तोंडावर मास्कही नव्हता. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांना लोकप्रतिनिधींनीच अशी केराची टोपली दाखवली, तर सर्वसामान्यांनी याचा काय आदर्श घ्यावा? हा प्रश्न पडतो.

महाराष्ट्र लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. परंतु त्यांच्याच पक्षातील आमदार जर कोरोना वार्डात विना मास्क जाऊन अशाप्रकारे फोटोसेशन करत असतील, तर महाराष्ट्रातील रुग्ण संख्या लवकर आटोक्यात येईल, असं दिसून येत नाही. त्यामुळे निलेश लंके यांच्यावर आता कारवाई होणार का? की, सर्व नियम हे जनतेलाच लागु आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

2 तारखेनंतर मुख्यमंत्री लॉकडाऊनबद्दल निर्णय घेतील, राजेश टोपेंनी दिले संकेत!

संजय राऊतांनी ट्विट करत दिला सूचक इशारा, म्हणाले…

“25 वर्षावरील सहव्याधीग्रस्त तरुणांनाही कोरोना लस द्या”

खळबळजनक बातमी; महाविकास आघाडीतील 2 ज्येष्ठ नेत्यांची अमित शहांसोबत गोपनीय बैठक?

‘या’ कारणामुळे पुरुषांच्या लिंगाचा आकार होतोय लहान; दिया मिर्झा म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More