बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नितेश राणे पेटून उठलेत?, मध्यरात्री केलं हे ‘करारा जवाब’ देणारं ट्विट

मुंबई | केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांकडून 4 अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत कानाखाली लगावण्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी राणेंना अटक करण्यात आली.

नारायण राणेंवर करण्यात आलेल्या या कारवाईनंतर नितेश राणे यांनी विरोधकांना फिल्मी अंदाजात आव्हान दिलं आहे. नितेश राणे यांनी अभिनेता मनोज वाजपेयी यांचा ‘राजनिती’ या चित्रपटामधील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये मनोज वाजपेयी एका सभेला संबोधित करत म्हणतात की, ‘आसमान में थूकने वाले को शायद ये पता नही है की पलट कर थूक उन्ही के चेहरे पर गिरेगी,’ तर पुढे ‘करारा जवाब मिलेगा, असंही त्यांना म्हंटलं आहे. व्हिडीओ शेअर करत नितेश राणे यांनी विरोधकांना थेट धमकी दिली आहे.

दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. या टीकेवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या- 

राऊत म्हणाले, ‘कोण राणे?,’ चंद्रकांतदादा म्हणतात, ‘कोणता सामना, आम्ही किंमत देत नाही!’

नारायण राणेंनंतर कुणाचा नंबर?; ‘या’ नेत्यांवर अटकेची टांगती तलवार!

शाब्बास माझ्या वाघांनो… उद्धव ठाकरेंकडून युवासेनेच्या कार्यकर्त्यांना शाबासकी!

“राज्य सरकारची झुंडशाही पाहून अफगाणिस्तानमध्ये तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील”

नारायण राणेंना धक्क्यावर धक्के, पुन्हा अटक होणार?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More