Rohit Pawar | लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्वच पक्षांकडून या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जातेय. लोकसभेत अजित पवार गटाला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. आता विधानसभेत महायुतीत कुणाला किती जागा मिळणार, याबाबत सर्वांचंच लक्ष लागून आहे. अशात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केलाय.
भाजप अजित पवार गटाला फक्त 20 जागा देईल किंवा स्वतंत्र लढण्यासही सांगेल, असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत. इतकंच नाही तर, अजितदादा गटाचे काही आमदारही आमच्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलंय. या दाव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडणार की काय?, याबाबत चर्चा रंगत आहेत.
रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार गटाचे काही आमदार जयंत पाटील यांना भेटल्याची चर्चा होती. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की,”जयंत पाटील खूप अनुभवी नेते आहेत. त्यामुळे कसं, कधी, कोणतं कार्ड बाहेर काढायचं? हे त्यांना खूप चांगलं माहीत आहे. त्यामुळे ही फक्त सुरुवात आहे. पुढे बघा काय होतंय.”, असं सूचक वक्तव्य रोहित पवारांनी केलंय.
दरम्यान, इंदापूरमध्ये एका कार्यकर्त्यानं थेट अजित पवारांचं नाव घेऊन विरोध दर्शवला होता. यावरही रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिलीये. “अजित पवारांबाबत बोलायला आता कार्यकर्त्यांनाही धाडसं आलंय. हे मुद्दाम केलं जातंय, असं ठरलेलं दिसतंय.सर्व जागांवर अजित दादांना उभं करायचं.शरद पवारांच्या पक्षाची मते खाण्यासाठी उभं करायचं. पण आमदार एवढे खुळे नाहीत ना? त्यांनाही माहीत आहे, भाजप त्यांचा कसा वापर करणार आहे.”, अशी टीका रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलीये.
“भाजप नेहमीच लोकनेत्याला संपवतं”
तसंच पुढे ते म्हणाले की, “अजित पवार भाजपसोबत राहिले तर त्यांना 20 ते 22 जागा दिल्या जातील. पण, भाजपपासून ते वेगळं झाले तर, सगळ्या जागांवर त्यांचे आमदार उभे राहतील. मात्र,निवडून कोणीच येणार नाही.” असा दावाच रोहित पवार यांनी केलाय. त्यांच्या या दाव्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. आता हे 22 आमदार नेमके कोण आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
तसंच या आमदारांपैकी सोबत कुणाला घ्यायचं ते शरद पवार आणि जयंत पाटील ठरवतील. काही आमदार खूप आधीपासूनच संपर्कात आहेत. त्यांना अनेक गोष्टींमध्ये अडकवलं जाईल. त्यांच्या नातेवाईकांना अडकवलं जाईल, त्यामुळे काही आमदार तिकडे गेले आहेत, असंही रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले आहेत.
News Title – MLA of Ajit Pawar group contacted us said Rohit Pawar
महत्त्वाच्या बातम्या
बैल खरेदीच्या वादातून झाला गोळीबार, पुढे घडलं भयंकर?
बीड कथित ऑडिओ प्रकरणी ‘या’ दिग्गज नेत्यावर गुन्हा दाखल
चांदीचे मंदिर, सोन्याच्या मूर्ती! अनंत व राधिकाची लग्नपत्रिका एकदा पाहाच
पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई; ‘या’ भागातील पब, बारवर फिरवला बुलडोझर
टीम इंडियाचा दणदणीत विजय! इंग्लंडच्या पराभवाची ही आहेत 3 कारणे