काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला! ‘या’ आमदाराचे निधन

Maharashtra l राज्याच्या राजकारणातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे. आमदार पी. एन. पाटील यांची आज पहाटे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाटील यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली :

आमदार पी. एन. पाटील हे रविवारी सकाळी 8.30 च्या सुमारास घरीचं बाथरूममध्ये चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले होते. यावेळी मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर आमदार पाटील यांना तातडीने आधारमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

मात्र, त्यांच्या मेंदूची सूज तशीच होती. त्यामुळे त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. आमदार पी. एन. पाटील यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. पाटील हे एक काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत मानले जाणाऱ्यांपैकी एक होते. कारण गांधी घराण्याच्या विश्वासू म्हणूनच पाटील यांची शेवटपर्यंतओळख झाली आहे. आमदार पी. एन. पाटील हे स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक होते.

Maharashtra l आमदार पाटील यांचे पार्थिव जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शन ठेवण्यात येणार :

अशातच जिल्हा काँग्रेसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज (23 मे) सकाळी 10 वाजता आमदार पी. एन. पाटील यांचे पार्थिव जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता त्यांचे पार्थिव मुळ गावी सडोली खालसामध्ये नेण्यात येणार आल्याची माहिती देण्यात आली आहे. आमदार पी. एन. पाटील यांचे सडोली खालसामध्येच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आमदार पी. एन. पाटील यांनी वयाच्या 25 व्या वर्षांपासून त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली. पाटील हे 1978 ते 1985 या काळामध्ये जिल्हा काँग्रेस जनरल सेक्रेटरी देखील होते.

News Title – MLA P. N. Patil passed away in kolhapur

महत्त्वाच्या बातम्या

पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठं वळण; कोर्टाने दिला मोठा निर्णय

या राशीच्या व्यक्तींनी वादाचे प्रसंग टाळावेत अन्यथा होईल मोठं नुकसान

“पंकजा मुंडे, सुनेत्रा पवार विजयी होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष”

मोठी बातमी! शाहरूख खानची तब्येत बिघडली, रूग्णालयात दाखल

पुणे अपघातप्रकरणी अमृता फडणवीसांनी केली मोठी मागणी!