मुंबई | मराठा आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर विधानभवनाच्या गेटवरच ठिय्या आंंदोलनाला बसले आहेत.
प्रकाश आबिटकरांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विधानभवनावर धडक मोर्चा काढला होता. मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना गेटवरच अडवलं म्हणून त्यांनी विधानभवनाच्या गेटवरच मांडी घालून ठिय्या मांडला.
दरम्यान, प्रकाश आबिटकर आज विधानभवनाच्या प्रांगणात आत्मक्लेश आंदोलन करणार होते. त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे परवानगी मागितली होती मात्र त्यांना गेटवरच अडवण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-अॅट्रॉसिटीबाबत सर्व पक्ष गप्प का?
-औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक; रस्त्यावर टायर पेटवलं!
-राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी!
-पोलिसांची ड्रोनद्वारे मराठा मोर्चेकऱ्यांवर करडी नजर
-मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 7 हजार पोलीसांचा बंदोबस्त!
Comments are closed.