बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सभागृहात सुपुत्राचा वॉकआऊट पण नातवाकडून न्याय”

नागपूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्यावर सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घोषणेचा निषेध करत सभागृहाचा त्याग केला. यावर काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी विदर्भाच्या सुपुत्रानं वॉकआऊट केला पण नातवाने न्याय दिला, असं म्हणत उद्धव ठाकरेंच कौतूक करत फडणवीसांना टोमणा मारला आहे.

आम्ही जे वचन दिलं ते पूर्ण केलं. ही केवळ सुरूवात आहे. आम्ही जेवढी वचनं दिली ती सर्व पूर्ण करणार आहोत. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसंच मार्च महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात येणार आहे, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक आदर आहे. ते सभागृहातही सर्वांशी हात जोडून बोलत होते. त्यांनी सभागृहात काही गोष्टींवरून विरोधकांची माफीही मागितली. एवढीच इतरांप्रती आदराची भावना जर विरोधकांमध्ये असती तर आज कदाचित आम्ही विरोधकांच्या जागी बसलो असतो, असंही प्रणिती शिंदे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सरसकट कर्जमाफीवरुन मुख्यमंत्र्यांची पलटी, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, त्यांनी कर्ज घेतलं असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही. महाविकासआघाडी सरकारनं जनतेचा विश्वासघीत केला आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More